शब्द
शब्द
1 min
204
शब्द हसवतात शब्दच रडवतात,
शब्दच शब्दाने वाढत जातात,
शब्द रागावतात, शब्दच शब्दाने आधार देतात,
शब्दात प्रेम आहे तस शब्दात द्वेष आहे,
शब्दात अहंकार तसा शब्दात अभिमान आहे,
शब्द मनाला सावरणारे,
शब्द अश्रू ओघळणारे,
कधी शब्द शब्दरुपी अलंकार,
तर कधी शब्द शब्दरुपी जादूगार,
शब्द कधी शब्दात झुलतात,
शब्दच आहे जे शब्दात हरवतात....
