शब्द
शब्द
शब्द खरे नक्षत्रांचे मोती,
रोमरोमी कुसुमे फुलवीत.
मनोहर नभांगण चमकत,
रम्य नीरव स्वर्ग उतरवीत.
शब्द फुले नवरत्नात गुंतले,
शोधे अस्तित्व मायाजाळ्यात.
मन, मेंदूच्या खेळ सारीपाट,
झेलत नौका वादळी झंझावात.
सुसंस्काराची ती खरी शिदोरी,
शब्द वापरावा कर्तव्यासाठी.
गात संत,देश,वीरांची पुण्याई,
मायभूमीच्या आत्मरक्षणासाठी.
शब्द जीवना मेघ मल्हार आलाप,
गुंफली देशहिता शमशेरी तलवार.
कोहिनूर हीरा चमके सोसत घाव,
अनुभव सूर चिथमोत्यांचा हार.
शब्द मनमोहक साक्षात्कार,
मंत्रमुग्ध मोरपंखी ही झालर,
अखंड ज्ञानगंगेचा झरस्त्रोत,
अजरामर झणझणीत जहर.
शब्द किरणांनी बरसत सोन,
परिसस्पर्श प्रफुल्लीत बेभान.
मदमस्त गंध चाफ्यांचा उधळत,
सोनसळी मखमली भासे रान.
