STORYMIRROR

Shamal Kamat

Others

3  

Shamal Kamat

Others

शब्द माझे सोबती

शब्द माझे सोबती

1 min
375

शब्दांचा करावा वापर

मनापासून सर्वांनी जपून

समोरच्याला देऊन आदर

शब्दांचा मान राखून


शब्दांतून करावे सर्वांनी

प्रबोधन सुंदर व छान 

लिखाणातून देऊन ज्ञान 

वाचकांना द्यावे समाधान


शब्द आहे अनमोल

सर्वांनाच बळ देते

आत्मविश्वासाचे शस्त्र बनून 

सगळ्यांची हिंमत वाढविते


गोड शब्द हवेसे वाटतात

शब्दांमुळे नाते जुळते

लहानापासून थोरांनाही

शब्दांमुळेच सारे काही कळते


शब्दांमुळे खूप काही घडते

कधी रागाने चढतो पारा

शब्दसखा सोबती बनून 

जुळवितो मनाच्या तारा


Rate this content
Log in