STORYMIRROR

Seema Gandhi

Others

3  

Seema Gandhi

Others

शाई कागद आत्मा (हे शब्दांनो)

शाई कागद आत्मा (हे शब्दांनो)

1 min
408

हे शब्दांनो...

हे शब्दांनो 

मी शरणागत केवळ तुम्हा...

जाणते अक्षरांच्या गुढ कृष्णविवरात

लपलेले असतात अनेक अर्थ, जाणिवांचे हळवे बंध...

नभसोशीकतेचा थरथरणारा पायरव बऱ्याचदा ऐकूच येत नाही...

कधी मनाच्या ओढाताणीत गुदमरू पाहतात शब्दांचे श्वास...

मात्रा,व्रुत्त, यमक असे साज नसले तरी शब्दांचा दरबार मात्र भरतो...

दत्त म्हणून उभ्या राहिलेल्या शब्दांचा प्रसाद स्विकारते...

काळावेळाचे बंधन न पाळता असीम आनंदाचा झरा अंतर्मनात झुळझुळतो ...

शब्द मोरपिशी मुरलीचा स्वर होऊ पाहतात...

अनेकदा शब्दांना जडवते शाई चा रुपेरी वर्ख...

संवेदनांचे पक्षी फडफडतात ...

स्रुजनाचे पंख लेऊन पार सुर्याला मुठीत पकडायला बघतात...

काही शब्द कागदासवे संन्यस्त होतात...

मौनाची भगवी वस्रे आत्म्यावर चढवतात...

रूणझुणत्या लडिवाळ लाटांची महिरप सजवायला मात्र नेहमीच तत्पर होतात...

शब्दांचे मोती नक्षत्रांचे वाण लेऊन सदा मिरवतात...

अपार गहिऱ्या जाणिवांना मात्र हळव्या मायेची शाल पांघरतात ...

मी शब्दांसाठी...

शब्द माझ्या साठी...

मोहमयी दुनियेत आम्ही एकमेकांसाठी...

हे शब्दांनो...

मी शरणागत केवळ तुम्हासाठी ...



Rate this content
Log in