Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Children Stories

3  

Vasudha Naik

Children Stories

श..चे गीत

श..चे गीत

1 min
298


श श शमा

शमा चल शाळेला

लिहायला न् वाचायला

शिकून मोठी व्हायला...


श श शाळा

शाळा आहे छान

शिकवणारे सारे गुरू

आहेत हो महान....


श श शिकरण

केळीचे मस्त बनवले

मुलांनी ते खाऊन

चाटूनपुसून फस्त केले...


श श शीळ

वाजवली पोपटाने

मिठू मिठू बोलून

करमणूक केली त्याने....


श श शेकोटी

हिवाळ्यात पेटवतात

लहान थोर सारे त्याच्या

ऊबेला उभे राहतात....


श श शैला

जावू आपण फिरायला

छान ताजी भाजी

मंडईतून आणायला....


श श शोकेस 

आहे ट्राॅफी ठेवायला

यश मिळव दादा

ट्राॅफी छान मिळवायला...


श श शौकत

चल मैदानावर खेळायला

मैदानी खेळ खेळ खेळून

आरोग्यसंपत्ती जपायला....


श श शंकर 

देवाधी देव आहे

शंकराला मानव

बेलपत्र  वाहे....


Rate this content
Log in