STORYMIRROR

काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

सभ्यतेचे भान राखून

सभ्यतेचे भान राखून

1 min
307

लोक म्हणतात, नंगे से खुदा डरता है

म्हणूनच की काय, तो शब्दांना नागवे करुन

आपलं वेगळपण सिद्ध करतो

का भागवतो सुप्त इच्छा मनातील आशा आकांशा

ओगळवाण्या शब्दात घोळून रेखाटुन..!!

मनाचा का मानाचा मळवट भरतो

तथाकथित दुखाःच्या अंतरपटा आडून

सजतोय नवरदेव नवा शब्दांच्या बोहल्यावर

स्विकारतोय पुष्पगुच्छ रोज नवनवे

समारंभ थाटुन..!!

अन् अडून बसतो मग डावरीवजा मागणीसाठी

अवास्तव अक्राळस्ता व्यक्त करून

लाखोली वाहतोय समाजाला..? नव्हे

हात बांधलेल्या त्या हतबल मूक संयमाला

द्रोह का विद्रोही म्हणत अभिव्यक्तीच्या बुरख्या आडून..!!

अमर्याद प्रसिद्धीच्या झुल्यावरून निघते वरात वाजत गाजत

चर्चा तितक्याच रंगतात त्याच्या अनोख्या विवाहाच्या

चाव्हाटयावरच्या हनीमूनच्या

लोक चविने चघळतात गल्लीपासून दिल्ली पर्यंत

वर म्हणतात आम्हास शक्य नाही असे नागवे होणे करणे

सभ्यतेचे भान राखून..!!


Rate this content
Log in