STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

3  

प्रतिभा बोबे

Others

सौंदर्य आणि फॅशन

सौंदर्य आणि फॅशन

1 min
310

फॅशन शाप आहे मोठा

सौंदर्याला लागलेला

एक विचित्र आजार जो

नव्या पिढीला जडलेला


खरे सौंदर्य असते साधेपणात

हेच मुळी कित्येकांना कळत नाही

फाटके कपडे फॅशन म्हणून वापरुन

सौंदर्यात काही भर पडत नाही


फॅशनच्या नावाखाली काही महाभाग

तारतम्य सोडून वागत आहेत

केसांना कापून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये

कानात बाळी अडकवून सुसाट गाड्या पळवत आहेत


समाजात एक नवी फॅशन आता

बऱ्याच घरांमध्ये वाढलेली आहे

जन्मदात्यांना वृद्धाश्रमी ठेवून मुले

स्वतः चैनविलासात रममाण आहे


फॅशनच्या या दुनियेत आता

सौंदर्य हरवत चाललं आहे 

फॅशनच्या नकली चेहऱ्यामागे

खरं सौंदर्य खरेपणासाठी लढत आहे


Rate this content
Log in