सावर रे मना सावर रे
सावर रे मना सावर रे

1 min

12.3K
साद घालतेस, हळूच बघतेस
भुरळ पडते, माझ्या मनाला
सावर रे मना सावर रे
सांगतो आतला कोपरा मनाला
सांगतो मी माझ्या मनाला
सावर रे मना सावर रे
समोर ती प्रतिमा, मानलेली प्रतिभा
साकारले स्वप्न रूप, मूर्त जणू ते
सावर रे मना सावर रे
ओलावा डोळ्यात, धुक्याचा पडदा
मनाला माझ्या, भुरळ पडते
सावर रे मना सावर रे