सार्वभौम
सार्वभौम
1 min
274
बांध अश्रूंचा फुटला
चीन देशाची विकृती
पसरली महामारी
ध्यानी मनी ही नव्हती
रोज दुःख वृत्त कानी
झाली रूणसंख्या वाढ
नसे स्मशानात जागा
निर्दोष्यांचा बळी द्वाड
किती जीवांची ही हत्या
राज्य प्राप्ती फुंके डंका
नक्षलवादी राक्षस
मैत्री आड करे शंका
प्रेमे जग जिंकण्याची
किती दिली तुला संधी
खाली मुठी सिकंदर
देह नाशे मृदगंधी
राग लोभ द्वेष सोडा
संत महात्मे सांगती
देश भारत संस्कृती
सार्वभौम ही शाश्वती