साऱ्या जगी गौरवाचा
साऱ्या जगी गौरवाचा
भारतीय, गणराज्य,
झाले , ते प्रजासत्ताक !
लोकांसाठी, लोकांनीच,
चालविण्यां, राष्ट्र एक !!1
संविधान, मान्यतेची,
स्मृती, आंबेडकरांची!
दरवर्षी, राजपथी,
वीर, पदके देण्यांची!!2
ज्ञात, अज्ञात असंख्य,
झाले, वीर बलीदानी !
गीते, गायची स्फुर्तीची,
आज, तयांना स्मरूनी!!3
शत्रु, आक्रमणकारी,
परतुनी , लावु आम्ही!
तिरंग्याच्या, सन्मानांसी,
आजीवन, झटु आम्ही!!4
आम्ही, करतो वंदन,
राष्ट्रध्वज, तिरंग्याला !
देह, प्रसंगी अर्पुनी,
वाहु, भारत मातेला !!5
रोम रोमी, बाळगतो,
अभिमान, स्वातंत्र्याचा !
आरोहण, जयघोष,
करू, राष्ट्राच्या ध्वजाचा !!6
भारतीय, लोकशाही,
साऱ्या, जगी गौरवाचा !
सांस्कृतिक, विवीधता,
वंश, धर्म संस्कृतीचा !!7