STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Others

4  

Surekha Chikhalkar

Others

सारे आकाश माझे

सारे आकाश माझे

1 min
289

तुझ्या हाती पाळण्याची दोरी

वाटेवरच्या काचा, पावलं रक्तबंबाळ

विश्वासाचा सूर्य, डोळ्यातलं अंगार

वाटेला आलं अर्धे आभाळ //१


काही दुःखाची, काही आनंदाची

संपली तुझी जूनी पानगळ

झुगारून नकाराची घंटा

संपवलीस तू मनाची मरगळ //२


पुरूषी अहंकाराला रिजवत पचवत

वाढवल्यास प्रत्येकीच्या आशा

चंग बांधून मनाचा

केली पादाक्रांत हर दिशा //३


घेतली भरारी 

     पुन्हा नव्याने

जिंकून जग सारे

    पाय रोवले तू जोमाने //४


तुझ्या आव्हानाला 

    सज्ज आभाळ सारे

पहाटेची नक्षी 

  कवेत कर्तृत्वाचे तारे //५


Rate this content
Log in