सांजवेळी...
सांजवेळी...
1 min
849
हायकू काव्यप्रकार
सांजवेळी गं
लावते दिवा आई..
वात समई...
हात जोडून
वाकून नमस्कारा
परमेश्वरा...
नमन माझे
सदगुरू रे नाथा
टेकवू माथा...
करू नमन
झाले प्रसन्न मन
अंत:करण....
धन्य जीवन
झालो रे धन्य धन्य
नवचैतन्य...
