STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

सांजवेळ

सांजवेळ

1 min
146

अलंकारी भाषा काव्य 

मना भरते सदैवं 

आयुष्याच्या सांजवेळी

मीळे आमुचे ते दैव!!१!!


सांज वेळी लक्ष्मी येते

 दिवा लावी तुळशीत 

मनी प्रार्थनेने भेटे

सरस्वती या काव्यात!!२!!


मंद मंद पावसात

चाले कृष्ण टोपल्यात

वसुदेवा डोक्यावरी

 जाई नंदाच्या घरात!!३!!


वसुदेव देवकीची

 कशी गेली सांजवेळ

मथुरेचा राजा बंधू

तरी बाई शृंखलेत!!४!!


सांजवेळ आयुष्याची

कशी येते कोण जाणे

आल्या जीवनात तुम्ही 

जगा सारे आनंदाने!!५!!


संतदास म्हणे तुम्ही 

करा देवाशी प्रार्थना

कर्म चांगले करता

भेटे वैकुंठीचां राणा!!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन