STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

4  

Mala Malsamindr

Others

सांजवात

सांजवात

1 min
22.5K

संध्याकाळ होता परतती 

गाय वासरू गोठ्याकडे

पक्षी पाखरे घरट्याकडे 

माणसे सारे घराकडे 


गृहिणी लावतात आशेने

सांजवातीचा दिवा देवापुढे

सूर्य मावळतो संपवतो दिनचर्या

जातो तो पश्चिमेकडे


चंद्रकोर देते अल्हाददायक

प्रकाश परावर्तित होतो धर्तीकडे 

आशेची ज्योत पेटते सर्वीकडे

सांजवात तेवत बघते संध्याकाळी कडे


रहाते जीवनी सांजवातीच्या

दिव्याची ज्योत तेजस्वी तेवत 

जीवनामध्ये प्राणज्योत ही उजळत

मांगल्याचे सार जीवनात रुजवत


आनंदाने माणूस तेजोमय होतो 

पक्षी माणसे विसावा घेतात निद्रेत

 ऊर्जा मिळते जीवन जगण्यास

कामाचा तान घालवतात सर्व झोपेत


Rate this content
Log in