STORYMIRROR

काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

सांगशील?

सांगशील?

1 min
372

वरवर रंगविण्याचा 

तू करू नको वृथा प्रयास..

बदलत्या वातावरणात

उघडा पडतो मनाचा कॅनव्हास..!!


हा दोष रंगांचा नाही

तुला रंग मिळवता आले नाहीत..

आणि कॅनव्हासचं म्हणशील तर

आधीचे रंग तुला खोडता आले नाहीत..!!


कदाचित रंग मिळालेही असतील

तुला हवे तसे अगदी बेमालूम..

पण अशक्य आहे

त्यांचे कॅनव्हासवर बेमालूम रंगणे

मूळ मनाच्या रंगास हेतुपुरस्सर टाळून..!!


तुझ्या दोन्ही रंगाची सळमिसळ म्हणजे

पाहणाऱ्याचा मानसिक छळ जणू..

मला समजत नाही

तुझ्या ह्या संधीसाधू चित्राला 

आता मी नेमके काय म्हणू..??

सांगशील?


Rate this content
Log in