सांड
सांड
आज पुन्हा एक स्त्री, एक मुलगी, एक कळी खुडली गेली,
काय होणार, होऊन होऊन, आठ-दहा दिवस हळहळ व्यक्त करणार, मेणबत्त्या पेटवल्या जाणार,
परत जैसे थे गोष्ट होणार,
आणि पुन्हा कळ्या खुडल्या जाणार,
स्त्रीही अन्याय सहन करत राहणार, आणि हा राक्षसी सांड डोकं वर काढत राहणार,
आणि संट्यासारखा फिरत राहणार, गावभर नाही तर भारतभर फिरणार,
यासाठी तर स्त्री आपल्या उदरात असह्य वेदना सहन करून दोन मांड्या फाडुन या सांडला जन्म देते,
तिला माहीतही नसतं याच मांड्या फाडुन हा आपली भुक भागवणार, हाच सांड स्त्रीची अब्रू वेशीवर टांगणार, ज्या स्तनातून अमृत पिऊन तो मर्द झाला, तेच स्तन तो रानटीपणे कुस्करून आपली मर्दानगी दाखवणार,
हा सांड मृत्यूचा खेळ खेळत राहणार, कितीतरी कळ्या आकांक्षा, वैष्णवी, प्रियांका, श्रुती, निर्भया, एकामागून एक पडद्याआड जात आहेत,
आणि हा सांड गल्ली बोळातूनच नाही तर घरा घरातून नंगानाच करत आहे, आणि आपण फक्त मेणबत्त्या लावत आहोत, आजही आठवण येते, महेंद्रगडमधील 10 वर्षाची कळी 12 सांडानी बलात्कार करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले, एवढेच नाही तर हा सांड घरा घरात मातत आहे, त्याच्या ओझ्याखाली स्त्री दबली जात आहे,
म्हणायला भारत स्वतंत्र आहे, असं म्हणतात, पण नीट डोकावले तर कळेल घरात बाहेर
स्त्रीला फक्त दाबलं जात आहे,
उठल्यापासून ते बिछान्यापर्यंत
ती फक्त नाचत आहे व नाचवलं जात आहे,
याने चार चौघात माय घालायची,
याला काही वाटत नाही,
या मायला या स्त्रीला ये रांड तुझी अवकात काय असे मन सुन्न
करणारे शब्द आजही एेकायला मिळतात,
सगळ्यांना वाटतं देश बदलला काळ बदलला, नीट प्रत्येक घरात डोकावून पाहिले तर कळेल, स्त्री रात्रीच्या अंधारात काय काय सहन करते, काय काय भोग भोगत आहे, हा राक्षस मस्तपैकी मंगळसुत्रानी सजवुन ही आता आपली हक्काची भोग वस्तू आहे,
आपण हिचा वापर पाहिजे तसा पाहिजे तेव्हा करू शकतो, पण याला हे कळत नाही,
एका मुंगीलासुद्धा संताप येतो, ती पण चावा घेते, मग ही तर हाडांमांसाची स्त्री आहे,
पण याचं आपलं ठरलेलं,
एका रांडेनंही सावित्री पण निभवावं, संत पण निभवावं,
आणि तो माणूस म्हणून त्याला माफही करावं,
सगळ्यांना प्रार्थना पाठ आहे, भारत माझा देश आहे, आणि
याला वाटलं तर सोडचिठ्ठी, काडीमोड यानेच करावी,
सगळ्या मर्यादा मात्र हिने पाळाव्या, यांना भर बाजारात
बेन चोद, बहीण घालु, माय घालु
म्हणायला काही म्हणजे काही वाटत नाही,
बिचाऱ्या माय बहीणला घरात माहीतही नसतं
की आपली अब्रू वेशीला टांगली जात आहे,
या पुरुष नावाच्या माणसाला
काय म्हणावं मग,
राक्षस सांड नाही तर काय म्हणावं,
आज पोटातल्या मुलीला मारलं जात आहे सर्रास अजूनही गर्भपात होत आहे,
या राक्षसी वृत्तीमुळे स्त्रीने स्वतःला डांबून ठेवले आहे
कोण उठवेल हा आवाज,
या दबलेल्या आवाजाला कोण
वाचा फोडेल,
कोण बळ देईन जगायला,
कोण आवाज उठवेल
कोण उठवेल...
