सामावून...
सामावून...
आज तो जाम वैतागला होता
सुन्न डोक्याने विचार करत होता
ईकडे जाऊ का तिकडे जाऊ.. मधेच थांबला होता
घर आणि विहीर यांच्यामधे..
सुचत नव्हते त्याला काय करावे
कोणती दिशा आणि कुठे जावे..
घरातून तर आताच आला होता त्या
ताज्या जखमा चोळत चोळत...
शिकला पण नौकरी नाही.. घरात पुरेल इतकी भाकरी नाही
बाप तापाने फणफणत होता.. बिड्या सुटल्या नाही
आईला शिव्या देत देत झुरके हाणत होता..
दोघे भांडत होती.. सगळे मुरदे माझ्या उरावर
कोणाला काम नको.. उठले मेले जीवावर.. तिची ती
रोजचीच वैतागवाडी होती.. म्हणून रोजच मार खात होती..
घराचे दारिद्र्य माणसं पाहत होती.. त्यांना त्याची लागण झाली होती.. ठिगळी कापडं.. गरिबीचा शिक्का अंगावर उठुन दिसे
त्याचाच लाज झाकण्यास सहारा, अंग तर झाकत असे..
हा शिकला म्हणुन विचार करू लागला.. नसता गाडला असता मातीत.. जिथे त्या पिढ्या गाडल्या..
शिकून त्याला देश समजला, लोकशाही समजली.. पण त्याची काय चूक.. त्याची आज चूल नाही पेटली..
म्हणून आज तो पेटला आणि निघाला पेटवून घेण्यास स्वतःला..
मागे पाहत, पुढे जात होता.. त्या जागी पोहचत होता.. जिथे मुक्त व्हायचे होते.. तो विहिरी जवळ गेला..
काठावर हात ठेवत खाली पाहून.. पाण्यास म्हणाला..
घे.. आज मला तू सामावून
जसे घेतो सर्वच सामावून... जसे घेतो सर्वच सामावून..
