सामाजिक विषय..
सामाजिक विषय..
व्यसनी तारुण्य
विस्कटलेल्या अंथरुणात
गोळा झालेला हा जीव
बघवत नाही रे मला
तारुण्य आहे मी.. नका नेऊ रे मला मरणाच्या दारात
व्यसनाचा पोरखेळ होता तो
आयुष्याचा खेळ झाला सारा
व्यसनाधीन होऊन का उतरविले रे मला मद्याच्या प्यालात
तारुण्य आहे मी नका नेऊ रे मला मरणाच्या दारात
बघतो तो तुला अडखळलेल्या पायांनी येताना
अपेक्षा होती त्याची तुला म्हातारपणाची काठी म्हणुन बघताना
काय अवस्था होती रे त्या बापाच्या मनात
तारुण्य आहे मी.... नका नेऊ रे मला मरणाच्या दारात
नऊ महीने गर्भात जपले तीने तुला
तीच्या काळजाचा तुकडा म्हणुन आयुष्यात आणले तिने तुला
निकामी झालेले तुझे हे शरीर बघवत नाही रे तिला
तिच्या काळजाचे तुकडे होताना दिसत नाही का तुला
तारुण्य आहे मी... नका नेऊ रे मला मरणाच्या दारात
काय मिळाले तुला व्यसनात भविष्याची चिता रचताना
झोकुन दिलेस अंधाराच्या झोकात स्वत:ला
तारुण्य आहे मी... जगायच आहे मला
अजुन म्हातारपण पहायच आहे मला
इतक्यात नका नेवु रे मला मरणाच्या दारात
व्यसनमुक्त होवुन जगवा मला आयुष्यात
जगवा मला आयुष्यात
