सागरलाटा
सागरलाटा
1 min
707
मनातील सागरलाटा,
की विचारांचे हे तुफान.
उचबळून नभी घेई भरारी,
स्वप्नझेपांच्या ह्या लहरी.
ह्या सागरी लाटा,
झेलण्यास मी उतरले.
त्या बालका सह,
आनंद लुटण्यास मी रमले.
सागरलाटाच्या ह्या चक्रव्यूहात,
कधी वाटते मी सापडले.
क्षणात त्यांने टाकले ढकलून,
क्षणातच बघ त्याने आत ओढले.
सागरलाटाच्या ह्या खेळात,
मी ही उतरून पाय रोखून खेळले.
मनसोक्त लाटा अंगावर झेलत,
मी सज्य होऊन, आनंदाने लढले.
