रविवार..ती सध्या काय करते.….?
रविवार..ती सध्या काय करते.….?
फोन आला
हॅलो ,हाय झालं
कोण ?
कसा काय फोन केलास..?
म्हंटल आज रविवार
करावा फोन...!
बरं, कसं काय? काय विशेष..?
काही नाही..!
म्हंटल विचारावं..!
काय...?
ती सध्या काय करते...?
संदिग्ध प्रश्न...
मी दचकलो
काय उत्तर देणार..?
अश्वत्थाम्याच्या जखमा
भळाभळा वाहू लागल्या
काहीच सुचले नाही
ती म्हणजे
नेमकं कोण हा मोठ्ठा प्रश्न.?
मी स्तब्द, निशब्द
काय करणार
पर्याय नव्हता
मित्र जिवाभावाचा
इतकेच म्हणालो
ती सध्या वाट बघते..?
कोणाची ?तुझी?
च्छा...!
मग..?
देव जाणे
पण इतकं नक्की
वाट बघते..!
तो गप्प......!
मी ही गप्प.....!
तिकडून आवाज आला
ठीक आहे..
ठेवू का फोन...?
बहुतेक दांडी उडाली
बरं वाटलं
लेकाला पटलं
गणित सुटलं....!
