STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

रविवार आजचा मस्त मजेचा...!

रविवार आजचा मस्त मजेचा...!

1 min
241

र विवार आजचा मस्त मजेचा

वि चार संचारतो मनी मोलाचा

वा ट लावली या उष्म्याने

र डणे उरले हाती या घामाने..

आ ग ओकता तो रवी राजा

ज र जर होतो जीव साहून सजा

चा वट पणा या निसर्गाचा

म ला वाटतो हा प्रताप कोपाचा...

स्त रच सोडला या निसर्गाने

म ज उष्म्याची सजा देण्या

जे जे पाहिले स्वप्न उरी मी

चा वट पणाने ते ते मारतो तो शिरी...


थकलो बाबा चाळे पाहुन तुझे

खरेच बरेच बाबा चुकले माझे

लावीन झाडे, जिरवीन पाणी

पुन्हा येऊ देणार नाही अशी आणीबाणी...


झाला तितुका पुरे झाला ताप तुझा

जन्मा आलो हाच का रे गुन्हा माझा

देऊ नको मज उष्म्याची पुन्हा सजा

रवि राजा जगण्यात राहू दे थोडी मजा....!


रविवार सुप्रभात...!


Rate this content
Log in