रुसलेले मन
रुसलेले मन
1 min
386
तडजोडी करता करता
पार आयुष्य सरलेले
वाफ स्वप्नांची उडाली
शुष्क किनारे उरलेले
आता सरते पाऊल
वाटेवर त्या स्वप्नांचे
रुते कंठात आवाज
आर्त रुसलेल्या मनांचे
मन देवाचा गाभारा
दु:खाला जागा नाही
काही पोरकी स्वप्ने
पायरीवर विसावलेली काही
माझे मन मोठे कोडे
सुटे ना कधीचे
दिसे बाहेर स्वच्छंदी
आत खोलवर तडीचे
आपल्याच खांद्यावर
आपलेच पार्थिव असे
मसणात रोजची वारी
ऊर तिलांजलीला फुटे
