रोजचीच सांजवेळ
रोजचीच सांजवेळ
1 min
442
पाखरांचे थवे बागडती
शोषित गार हवेचा मेळ
घरट्याकडे झेपावतांना
रोजचीच ती सांजवेळ
सुटला मंद-गार वारा
करित फुलांशी नटखट खेळ
सुगंध पसरला काननी
रोजचीच ती सांजवेळ
झाडाआड लपून पक्षी
घालित सुखःदुखाची शीळ
दिवसामागून दिवस उडती
रोजचीच ती सांजवेळ
सुमधूर भक्तीरसात सजली
गोडगोजिरी सांजवेळ
सुमधूर गीत भिनले नभी
रोजचीच ती सांजवेळ
नभीच्या भास्कराचा
लपंडावाचा रंगला खेळ
गोड चंद्रमा उगवण्याची
रोजचीच ती सांजवेळ
