Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Others

4  

Neha Ranalkar

Others

रणचंडी भवानी महिषासुर मर्दीनी

रणचंडी भवानी महिषासुर मर्दीनी

1 min
235


नवदुर्गा तु आदिशक्ती तुच खरी रणचंडी!

शितला कधी तर कधी गळ्यांत नरमुंडी!!१


कधी होऊनी जगन्माता घेशी आम्हा उरी!

विघ्ने येता लिलया तू आम्हांसी पार करी!!२


ठेव सदा अशीच माते कृपा आमच्या वरी!

शांती सुख समृद्धी नांदो सर्वांच्याच घरी!!३


आज शत्रू पातला बघ येऊन ठेपलाय देशदारी!

होऊनी तव हिंदमाता धूळ त्या शत्रुशी चारी!!४


भवानी तलवार आज माते देई अमुच्या करी!

नेत्रातूंनी अंगार फेक त्या दुष्ट यवनां वरी!!५


करी मर्दन त्या नामर्दांचे असती बलात्कारी!

स्री निष्पाप बालिकांस पिडती जे अत्याचारी!!६


दे शक्ती त्या सबलांना ठरो कधी न पुन्हा अबला!

छाटूनी गे हात तयांचे डोक्याचा करु तबला!!७


शुंभ निशुंभा परी राक्षस जणू आज मातले!

स्री बालिकांच्या रक्ताने हात ज्यांचे माखले!!८


रक्तपिपासु श्वापदांनाही ज्यांनी मागे टाकले!

जन्मदात्यांचेही लज्जेने शीर खाली वाकले!!९


महिषासुर मर्दीनी होऊनी घेशी अवतार खरा!

पिडीतांच्या अन्याया विरुद्ध फोड वाचा जरा!!१०


नवरात्रींच्या सर्वच रात्री रंगवू गरबा जागरण!

दे स्वातंत्र्य,सम्मान अन्यथा उपोषण आमरण!!११



Rate this content
Log in