ऋणानुबंध
ऋणानुबंध
1 min
776
आठवणीच्या शिदोरी,
मी ओले चिंब होत असते.
जुळले,मराठी शिलेदारांशी ऋणानुबंध,
मनमोकळे करत लिहित बसते.
अद्रुष्य ऋणानुबंध मोरपंखी झुलते.
विविध विषयाने प्रत्येक काव्य दरवळते.
अनुबंध नात्याचे जुळवित शिकते.
निरपेक्ष प्रेमाची साद घालत हसते.
कवितेच्या वेलीतून कवित्व बहरलेल.
ह्दयाच्या कोपऱ्यात ध्यास वसलेल.
ऋणानुबंधात हळूहळू जपलेल.
तुझ माझ न करता प्रेमाने जिंकलेल.
जन्मोजन्मीची लाभो ही रेशीमगाठी.
जीवन समर्पण सक्षमीकरणासाठी.
अतुट अम्रुतुल्य तो ऋणानुबंध.
नसानसातून दरवळू सदैव मधुगंध
