STORYMIRROR

काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

रंगतरंग

रंगतरंग

1 min
479

भूतकालीन बोचणारे 

ते ओबडधोबड खडे

तू भिरकावून दे 

वर्तमानाच्या पाण्यावर

अन् घे आस्वाद बालकापरी

उठणाऱ्या त्या 

भविष्य नामे मोहक तरंगाचा...!


तसे सर्वच रंग 

असतात पूरक या जगण्याला

काळा म्हणून धिक्कारू नको

अन् पांढरा म्हणून चुचकारूही नको


बघ मिसळून एकमेकात

मग कळेल तुला 

हा मेघांचा धुंद बेधुंद वर्षाव

अन् अर्थही लाभेल नवा 

तुझ्या थिजलेल्या भिजण्याला...!


Rate this content
Log in