रंगांचे गाणे
रंगांचे गाणे
1 min
319
मिळूनी सारे
चला गाऊ या
रंगांचे गाणे
सुंदर भारी
मजेमजेचे
रंगांचे गाणे।।धृ।।
पांढरा खडू
नि काळा फळा
रंग शोभतो
आकाशी निळा
हिरवे डोंगर
हिरवी राने
हिरवीगार
झाडांची पाने।।1।।
जांभळा झगा
वांग्याचा खास
पिवळा झेंडू
फुले झकास
लाल टमाटे
रक्तही लाल
लालभडक
कुंकाचे लेणे।।2।।
गोड गुलाबी
रंग गोजिरा
स्त्रियांचा असे
भलता प्यारा
नारंगी रंग
दिसे साजिरा
मोहकतेचे
गातो तराणे।।3।।
इंद्रधनुष्य,
प्राणी व फुले
फुलपाखरू,
रंगांनी खुले
रंगीबेरंगी
निसर्ग सारा
सर्वा लाभले
रंगांचे देणे।।4।।