रंगाचे भरतो थवे
रंगाचे भरतो थवे
1 min
248
रंगाचे भरतो थवे
नवरंग असे विवीध रूपात
अशी नजर हवी बघणाऱ्यात
पृथ्वीवर सुर्य उधळतो रंग नवे
निसर्गात रंगाचे भरतो थवे
कुुमूदिनी नव उल्हासाचा संग
निसर्गाच्या अंगाअंगात नवरंग
नवरंग पाखरू पंख पसारी
आल्हादाची मनी गगन भरारी,
रंग इंद्रधनुचा लावन्य सिंधू
हिरवळ भरे सुप्त दवबिंदू
जलाशय सागर झरे ओहळे
करी मंथन रंग दावी वेगळे
