रंग प्रितीचे
रंग प्रितीचे
1 min
665
प्रितीचा रंग गालात खुले,
नजरेची जुगलबंदी चाले.
दोघांच्या रोम रोमात शहारे,
अन प्रेमाचे झुळझुळणारे वारे.
सुगंधित मोगऱ्याची वेणी,
तू माळली माझ्या केसात.
तो प्रितीचा रंग बहरत,
खुलवून आला माझ्या गालात.
हास्याचे,प्रितीचे रंग,सणाचा सुगंध,
फुलवित येतो मैत्रीत,नात्यात गंध
होळीचा रंग संस्कृतीची जान,
मान, आदराचे आम्हा अभिमान.
मला आवडला तो क्षण,
जो देशाच्या प्रितीत रंगलेली.
संचार ते साऱ्यांच्या अंगी,
देश भक्ती ही लपलेली
