STORYMIRROR

Vijay Sanap

Others

1  

Vijay Sanap

Others

रंग होळीचे

रंग होळीचे

1 min
420

( षडाक्षरी काव्य )

नका खेळू तुम्ही

होळीचे   बेरंग

शहीद वीरांचा

होई ज्यात भंग ।।

पुसले रे कुंकू

ताईच्या भाळीचे

नकाच    उधळू 

रंग ते होळीचे ।।

व्हा तुम्ही सामील

सारेच    दुःखात

करू  नका होळी 

साजरी     रंगात ।।

करु नका सण

रंगाचा  साजरा

टेकवून  माथा

करुया  मुजरा ।।

होळीचा  आनंद

ठेवा जरा बाकी

कळू द्या  तुमची

जगाला लायकी ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन