रंग हा स्त्रीत्वाचा
रंग हा स्त्रीत्वाचा
1 min
605
चौफेर वावर माझा परी भासे रोजच नवा.
मी पुन्हा पुन्हा शोधून पाही माझाच रंग नवा.
उगवतीच्या रंगापरी मी ही सुर वात नवी.
मावळतीचा सूर्य ही मीच नी रात्रीच्या लोभस शशी कला ही मी.
इंद्रधनुष्याचे सप्तरंग मी,नित्य हवा असा आभास मी.
शृंगार हा शब्दांचा रंग त्यावरी भावनांचा.
उधळत जाती दाही दिशांना
रंग हा स्त्रीत्वाचा जणू राधे कृष्णाच्या रासक्रीडा.
निर्मळ हा रंग गोदावरीच्या पाण्यासम,
सामावूनी घेई अवघ्या दुनियेचे रंग.
