रम्य बालपण
रम्य बालपण
1 min
221
वय वाढू लागतं अन्
छळू लागतं मोठेपण
डोकावून जातो विचार
सुखाचं होतं बालपण।।धृ।।
गावाजवळच्या नदीत
मजेने खूप पोहायचो
उडवायचो गार पाणी
खेळ कितीक खेळायचो
निघून गेले दिवस ते
उरली फक्त आठवण।।1।।
वडा पिंपळाची झाडे ती
सावली त्यांची गर्द गार
वृद्ध सारे तिथे पेंगती
पोरे खेळती खेळ फार
दिसत नाही आता झाडं
आहे उन्हाची रणरण।।2।।
पैसा अन् नोकरीपायी
भुललो आम्ही शहराला
धकाधकीच्या जीवनात
विसरलो खेडेगावाला
गावाच्या त्या गोड स्मृतींची
मनात केली साठवण।।3।।
