STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
241

परंपरा ही रक्षणा बहीणीच्या,

रक्षाबंधन हा सण प्रेमळ संस्कृतीचा.

भाऊ-बहीण अतुट नातं नवलाईचा.

मनामनात प्रेमाची ज्योत रोषणाईचा.


पहिली राखी अर्पिली सद्गुरुना,

मग अर्पिली सर्व देव देवताना.

एक राखी त्या सर्व सैनिकांस स्मरण,

मागणे मागते, कर सदैव रक्षण.


भारतीय संस्कृतीचा सण,

औक्षणाचे असे प्रमुख स्थान.

तबकी घेऊन सुमन ज्योत.

रेशमीबंधात वाढत राहू दे प्रीत.


प्रत्येक सैनिकास,अन भावास,

मागणे मागते करून औक्षण देवास.

आम्हा सर्वांच्या पाठीशी राहून,

सदैव कर आमचे व देशाचे रक्षण.


रंक्षाबंधन माहेरवाशिणीचा भेटीचा,

सासर, माहेर मिलन गाठीचा.

स्वतःच्या हाताने मिठाई भरवत

उजळणी बालपणातील आठवणीचा.


वेळच नाही कुणासही आज,

जो तो धावतोय नोकरीपाठी.

नात्यात प्रीतीचा सुगंध दरवळण्यास,

आला सण रक्षाबंधन, आठवण देण्यासाठी.


Rate this content
Log in