STORYMIRROR

Deepali Mathane

Others

3  

Deepali Mathane

Others

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
238

एका नाजूक धाग्याची ही विणं

सुख-दुःखाच्या आसऱ्याला 

घट्ट नात्याचे बंधन सजले

भावा-बहीणी सह साऱ्याला

   अनमोल नात्याचे बंध हे

  रूसवे-फुगवे कधी लाडीगोडी

   भावा-बहिणीच्या नात्यात

  चाले कधी-कधी थट्टा थोडी

आदरयुक्त भीतीचे कुंपण

जपणूक करी नात्यांची

आभाळ मायेत बरसे

साथ वात्सल्य मोत्यांची

    सुख-दुःखाचा गहीवर

    भावा-बहीणीची साथ

    रक्षासूत्रात बांधली गाठ

    आशिर्वादाचा देऊनी हात

एक रेशमाचा धागा बघा 

जिव्हाळा जपतो हा किती

तिच्या हक्काच्या माहेराला

 न लाभो कधी ओंजळ ही रिती

    रक्षाबंधनाच्या सावलीत

    उजळू दे जीवनाची निशा

    भावा-बहीणीच्या सुख-सौख्यात

    दुमदुमल्या विश्वातल्या दाही दिशा


Rate this content
Log in