STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

रक्षाबंधन-कविता

रक्षाबंधन-कविता

1 min
201

रक्षाबंधन सण बहीण भावाचा 

एकमेकांच्या स्नेह भेटीचा 

नाते अतूट टिकविण्याचा 

वर मागावा दीर्घ आयुष्याचा  


  धागा नात्याचा, निरोगी जीवनाचा 

  हीत भावाचे कायम जपण्याचा 

  वारा नको स्वार्थ बुद्धीचा 

  आदर्श असावा निर्मळ पाण्याचा 


विचार सुख समृद्धीचा, भरभराटीचा 

आधार द्यावा बहिणीने काळजाचा 

स्नेहबंधुत्व अतूट रक्ताचा 

धागा बांधावा दीर्घ रक्षणाचा  


नको लोभ कुठल्या धनाचा

आयुष्यभर नाती टिकविण्याचा 

इडापिडा, दारिद्रय टाळण्याचा 

आधार द्यावा त्यास जगण्याचा  


सहभाग असावा शाळांचा 

महीमा सांगावा बहीणीच्या मायेचा

नाती कायम पवित्र जपण्याचा 

भ्रूण हत्या कलंक पुसण्याचा


Rate this content
Log in