रक्षाबंधन - भाऊ बहिण
रक्षाबंधन - भाऊ बहिण
1 min
183
नाते एक अनमोल
असे भाऊ बहिणीचे
जुळे बंध नकळत
फुले गीत भावनांचे ||१||
उन्हातान्हात राबतो
सकलांना करे सुखी
आनंदाने तृप्त होतो ||२||
सैनिक हा दादा माझा
सीमेवरती लढतो
बलिदान देऊनिया
रक्षण सारे करतो ||३||
रक्षाबंधन या सणाला
आठवणीत ठेवूया
सदैव साथ देऊनी
संस्कृती सारे जपू या ||४||
