STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

3  

Sanjana Kamat

Others

रिमझिम

रिमझिम

1 min
11.8K

रिमझिम रिमझिम पाऊस धारा.

छान छान थंड, थंडगार वारा

धो धो पाऊस पडतो हा

धरतीला नटवाया येतो हा


नवीन पालवी अन चेतना

बहरुन येते माझ्या ज़ीवना

बालपणीच्या आठवणीत न्हाऊ द्या

रिमझिम पावसात नाचू गाऊ द्या


बालपणीचा खेळ न्यारा

स्वच्छंदी मन, निर्मळ वारा

मायबापाच्या सावलीत राहू द्या

बालपणाच्या स्वप्नात राहू द्या


शाळेत भेटल्या कितेक मैत्रिणी

काही खट्याळ अन सदगुणी

ऐकमेकांचा डब्बा संपूर्ण खाऊ द्या

जगाला विसरून जावू द्या


नको हा थोरपणा, चिंता काळजीचा मेवा

भूरकन बालपण हरवलंय ना

बालपणात हरकून राहू द्या

रिमझिम रिमझिम पावसात जावू द्या


Rate this content
Log in