राष्ट्राचे शिल्पकार
राष्ट्राचे शिल्पकार
1 min
329
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
महापुरूष तोचि हो थोर ॥धृ॥
संघर्ष करूनी
शिक्षण त्यांनी घेतले
बुध्दीवंतानं त्या
कायदयाचं राज्य आणले ॥१॥
संविधान हो लिहुनी
आमचा उध्दार करूनी गेले
आपल्या सार्यांचे
जीवन सुखकारक केले ॥२॥
दिन-दुबळ्याचे
जनसेवक ते झाले
समान न्याय,हक्कसाठी
सारे आयुष्य वेचले ॥३॥
डाॅ.आंबेडकरांनी राष्ट्र हे घडवले
लोकशाहीसाठी अपार कष्ट केले
माझ्या देशाचे शिल्पकार
सारा देश असे त्यांचा कृतज्ञ ॥४॥