STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

रानफुले

रानफुले

1 min
442

गर्द हिरव्या पानात

फुले सुंदर गोजिरी

रंग घेऊन जांभळा

मन प्रसन्न रे करी


जणू डुले कर्णफुले

कानी गवताच्या राणी

शोभे फुलांची रांगोळी

झाली सुगंधी धरणी


रंग तजेला घेऊन

मस्त वाऱ्यात डुलती

धुंद होऊन सुमने

पहा हासत नाचती


रूप देखणे घेवून

जन्म वेलीवर घेती

गंध वाऱ्यात सोडून

सारा सुवास पेरती


किती गोड हा ताटवा

चक्षु भुरळ पाडती

दान निसर्ग पाहून

डोळे आनंदून जाती


फुले कोमल स्वच्छंद

झोका वाऱ्यासवे घेती

रानफुल वर्षावात

कशी अवनी ही न्हाती


Rate this content
Log in