STORYMIRROR

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

रानगंध

रानगंध

1 min
326

येई आभाळ भरुन

होई मनामधी खुशी

रान पेराया निघतो

स्वप्न बांधून उराशी


येता मिरगाची सर

दरवळे रानगंध

खुणवितो रानवारा

झुळूझुळू वाहे मंद


मेघराजा बरसला

मायभूमी सुखावली

पसरला रानगंध

शालू हिरवा नेसली


रान  हिरवं हिरवं

फुलू लागला रे मळा

येई धावून पाखरं

नित्य भरु लागे शाळा


रान  शिवार  फुललं

पक्षी गाऊ लागे गाणी

कानी येता कुजबूज

मन येतं रे भरुनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन