STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

राजीव गांधी

राजीव गांधी

1 min
266

फिरोज गांधी त्यांचे वडील

तर भाऊ होते संजय गांधी

पहिल्या महिला पंतप्रधान

त्यांची आई होती इंदिरा गांधी


पत्नी होती सोनिया गांधी

राहुल नि प्रियंका त्यांची मुले

देश प्रगतीपथावर गेले ते

राजीवजींच्या धोरणामुळे


देशाचे तरुण वयाचे पंतप्रधान

मिळाला त्यांना हा बहुमान

इंदिरा आईच्या हत्येनंतर

त्यांनी सांभाळले देशाची कमान


पंतप्रधान होण्यापूर्वी होते

ते एअरलाईन्सचे वैमानिक

राजकारणात नव्हते रस

जीवन होते त्यांचे ऐच्छिक


संगणक युगाचा केला प्रारंभ

टेलिकॉम मध्ये केली क्रांती

बोफोर्स घोटाळ्यात नाव आले

राजकारणावर आली संक्रांती


देशाचे सर्वात तरुण तडफदार

नेहरू घरातील तिसऱ्या पिढीचे

तामिळनाडूच्या जाहीर सभेत

हत्या घडविले राजीव गांधीजीचे


Rate this content
Log in