राहिलो ना तो....
राहिलो ना तो....
1 min
225
किती ओवाळला तुझ्यावर जीव
तू केली ना कधी प्रेमाची कीव
आता ग तुला भेटला कोण आहे तो...
तू ही बदललीस मी ही राहिलो ना तो
कोणासोबत हसतेस कोण आहे तो....
समोरून तू जातेस जीव जळतो
तुझा चालबाजपणा मला छळतो
कोणाच्या हातात हात कोण आहे तो....
तू झालीस माझ्यासाठी गैर मी कोण
ठेव थोडी तरी माझ्या प्रेमाची जाण
मारतेस त्याला मिठी कोण आहे तो.....
तुझ्या सोबत जोडल होत मी नाव
तुझ्यासारख बईमान निघाल तुझ गाव
माझ लुटून तू त्याला दिल कोण आहे तो.....
