पुरुष
पुरुष
तू आहे पुरुष
प्रपंचाचा मान
जीवनाचा काठ
संसारात शान.....१
भाऊ बहिणीचा
भ्रतार भार्येचा
सांभाळ नात्यांचा
माळी ही बागेचा......२
बाप तो संभाळी
संसार रहाट
जीवाला चटका
लेकरा पहाट........३
मदतीचा हात
देऊन साऱ्यांस
साहे कष्ट भोग
निस्वार्थ ती आस.......४
संसार सारथी
तो क्रुष्णा सारखा
देह त्याचा झिजे
चंदना सारखा........५
घराचे अस्तित्व
बाप ठेवी माया
कर्तव्याचा गाडा
आभाळाची छाया........६
जीवलग मित्र
जाणे अंतरंग
सदा तो तत्पर
प्रेमळ तो ठंग........७
समंजसपणे
नेई नाव तीरा
सुदंर जीवना
कठोर तो जरा.......८
तळमळ जीवा
संसार तो सुखा
कस्तुरी सुगंध
करून पारखा.......९
नवीन चैतन्य
तो मार्गदर्शक
यशाचे प्रतिक
आयुष्य पुस्तक.......१०
