STORYMIRROR

Pradip Hiwarkhede

Others

4  

Pradip Hiwarkhede

Others

पुरुष

पुरुष

1 min
331

पुरुष म्हणजे सशक्त,

आसक्त, अस्वस्थ, तळमळणारा, 

हळहळणारा, तडफडणारा, फडफडणारा, 

कोणी वारा,


कधी शांत नदी सारखा

कधी खळखळणाऱ्या सागरा सारखा, 

कधी उद्रेक ज्वालामुखीचा, 

तर कधी तप्त सळळणाऱ्या लाव्ह्यासारखा,


कधी कळस कठोरतेचा

कधी मथडा ममतेचा, 

कधी पुतळा मदणाचा,

तर कधी आदर्श असह्य वेदनेचा,


लहान असुन जाणीव मोठेपणाची 

मोठा होऊन जाणीव घरच्या प्रश्नांची,

सगळ्यांसाठी अविरत झटणारा, 

अखंड झगडणारा, 

जुलमी परिस्थितीशी, 

कायमच तडजोड करणारा,


खुपच हट्टी असतो तो, 

चिवट ही तितकाच असतो, 

उत्तर प्रश्नांचे मिळत नाही तोवर, 

कधीच थकत नसतो तो.....


Rate this content
Log in