पुरुष समजावून घेतांना
पुरुष समजावून घेतांना
अत्यंत अवघड होऊन जात
पुरुष समझावून घेतांना
आणि त्याच्या विचित्र
स्वार्थी मानसिकता
जाणून घेतांना...
आईचा सेवा करीत
आईचे गुण गाऊन
आई पाहिजेच म्हणतो,
राखी बांधणारी
भय्या म्हणून प्रेम करणारी
बहीण पाहिजेच पाहिजे म्हणतो,
आजीवन सुख दुःखात
संगत चालायला
भार्या पाहिजेच म्हणतो
पण...
मुली नको म्हणणाऱ्या
पुरुष समझावून घेतांना
खूपच गोंधळून जातो मी
का आठवत नाही त्याला
स्त्री भ्रुण हत्या म्हणजे
एकाच वेळी
चार चार जणांचा हत्या
असल्याचा सत्य
कोणाची मुली,
कोणाची बहीण,
कोणाची पत्नी आणि
कोणाची आई ची हत्या
असल्याचा सत्य
अत्यंत अवघड होऊन जात
पुरुष समजावून घेतांना
आणि त्याच्या विचित्र
स्वार्थी मानसिकता
जाणून घेतांना..।
