STORYMIRROR

Mita Nanwatkar

Others

3  

Mita Nanwatkar

Others

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण संरक्षण

1 min
11.4K

घरातील कचऱ्याचे 

अचूक व्यवस्थापन करू या

ओला आणि सुका कचरा 

वेगळा करू या.....


कचऱ्याचे रूपांतर 

खतात करू या

शेतातील पिकांसाठी 

त्याचा वापर करू या....


रासायनिक खतांचा

वापर टाळूया....

सेंद्रिय खतांचाच

उपयोग करु या....


विजेचा आवश्यक तितका 

आवश्यक तेथे वापर करू या 

वेळीच सर्व बटनं

बंद करू या....


सौरऊर्जेचा कौशल्यपूर्ण

वापर करू या.....

त्यासाठी नवनवीन

प्रकल्प शोधू या....


नैसर्गिक संपत्तीची

जपणूक करू या......

जागा मिळेल तिथे एक झाड लावूया

त्यांचे मनापासून संवर्धन करू या.....


वाढदिवसाशी प्रत्येकाला

झाडे भेट देवू या..... 

वृक्षारोपणाचे महत्त्व

साऱ्या जगाला सांगू या....


पाण्याचा वापर 

काटकसरीने करू या

सांडपाण्याचाही 

पुनर्वापर करू या...


उंच उंच डोंगररांगाना 

हिरवेगार करू या....

ओघळून जाणाऱ्या

पाण्याला अडवू या.....


पावसाचे पाणी जपून ठेवू या 

त्यासाठी नवनव्या युक्त्या करू या.....

'रेन हार्वेस्टिंग' अमलात आणू या

पाण्याची टंचाई दूर पळवू या....


प्लास्टीकचा वापर

पूर्णपणे टाळू या

कागदी पिशव्यांचा 

प्रचार करू या......


आवश्यक तेथेच

वाहनं चालवू या...

कधी कधी सायकलचाही

मनसोक्त आनंद घेवू या......


एवढंसं काम 

मन लावून करू या.......

वसूंधरेला या

प्रदूषणमुक्त करू या......       


Rate this content
Log in