प्रवास
प्रवास
1 min
345
मनाची आज मोडली आस
एकटा करत आहे मी प्रवास....
कोणत्या गावी जाऊ कळेना
प्रेमाचा कूठे का खाऊ मिळेना
काळ्या मनाचा हा वेगळा त्रास....
जीवनाचा झाला माझ्या जोक
दुर पळत आहेत बघा ते लोक
डोळ्यात अंधार सापडेना निवास....
सोबत का नाही माझ्या कोणी
कशी सांगू कुणाला मी कहाणी
कसा करू मी जीवनाचा ध्यास.....
संगम धीर धर होईल तूझं नाव
सापडेल तुला स्वप्नातल ते गाव
खुप मोठा तुझ्या कर्तूत्वाचा व्यास....
