STORYMIRROR

Deepak Ahire

Others

2  

Deepak Ahire

Others

प्रतिक्षा...

प्रतिक्षा...

1 min
80

प्रत्येक गोष्टीचा असतो काळ, तेवढा वेळ द्यावाच लागतो,

घाईने कोणतीच गोष्ट होत नाही, चुकांचा संभव जास्त असतो

गोड फळ हवे असेल तर प्रतिक्षा करा,

वाट पाहावीच लागते, थोडं थांबून धीर धरा

यश मिळवायचं असेल तर, काळाला स्वार होऊ देऊ नका,

काळावर स्वार होऊन वळवावे, अपयशाने प्रयत्न सोडू नका

हळूवार व ठोसपणे बांधलेली, इमारत टिकते दीर्घकाळ,

पूर्ण क्षमतेने योजना कार्यान्वित, तरच जुळेल यशाची नाळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन