STORYMIRROR

काव्य चकोर

Others

3  

काव्य चकोर

Others

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

1 min
275

विरहाच्या वेदना अंतरी रुजवून

परतीचा पाऊस वाटेवर रेंगाळला..

फाटले आभाळ पाझर नयनी 

अंतरबाह्य असा मनी हेलावला..!!


लागला सुरुंग तुटला स्वप्नझुला

किती वेदना त्या इवल्या मनाला..

व्यर्थच सारा थयथयाट परी

संवेदनांची जाणीव इथे कुणाला..!!


दावू नकोस डोळ्यातील टिपूस

न कळणार दुःख तसे जगाला..

करून भांडवल याच अश्रुंचे

संसार जगाने उभा मांडला..!!


रितेपणाचे शल्य अंतरीचे तुझ्या

न जाणवणार कधी भरल्या ओंजळीला..

आज भरली तरी उद्या रीती होईल 

ही प्रचितीची साक्ष येते अनुभूतीला..!!


Rate this content
Log in