STORYMIRROR

Sanjana Kamat

Others

4  

Sanjana Kamat

Others

परिसस्पर्श

परिसस्पर्श

1 min
23.5K

परीसस्पर्श पहिला मायबापाचा,

जन्म लाभला आतुल्य मानवाचा.

कळस गाठला तो सुसंस्काराचा,

शोध घेतला पंखातील बळाचा.


शाळा ही माझी परिसस्पर्शाची,

जीवनाची मोल्यवान पायरी खरी.

विविध गुणाचे मोती माळेत गुंफण,

सोनेरी पंखाची कल्पना घेई भरारी.


स्पर्शगंध तो यैवनात येता येता,

ह्दयाचे मृगजळ जिंकले जाता जाता.

सत्वपरीक्षांची देत अग्निपरीक्षा,

जीवन सार्थकी चढे पूर्णत्वाची अपेक्षा.


लाॅटरी प्रेमाची,तो विवाह सोहळा,

स्वप्नपूर्तीचा अविस्मरणीय हिंदोळा.

दोघांच्या मिलना षढरिपुं संहारला,

सप्तरंग उधळून मनी वसंत फुलला.


परिसस्पर्श गोड सदगुरू कृपेचा,

मिटला मोहमायेचा हिशोब सारा.

निष्पाप देहास मोक्षपदाचा आसरा,

उद्ध्वस्त जीवनास भेटला किनारा.


Rate this content
Log in